शेतमाल वाहतूकदार आणि दलालांसाठी

शेतापासून मार्केटपर्यंत,
प्रत्येक खेपेचा हिशोब.

वहीतला हिशोब आता मोबाईल आणि कॉम्प्युटरवर. माल नोंद, आठवड्याचे भाडे, दलालनिहाय पावती, गाडी आणि कामगार - सगळं एकाच ठिकाणी.

🥬भाजीपाला 🍇फळे 🧅कांदा-बटाटा 🌾धान्य-कडधान्य 🌼फुले
१ मिनिट
एका खेपेची पूर्ण नोंद
१ क्लिक
आठवड्याची भाडे पावती तयार
३ विभाग
माल-भाडे, गाडी-चालक, कामगार
बदल

वहीतून खेपमध्ये

पहाटे गाडी निघते तेव्हापासून आठवड्याच्या पावतीपर्यंत - कागदाशिवाय.

📒 जुनी पद्धत - वही

  • प्रत्येक खेप हाताने लिहायची, खाडाखोड
  • आठवड्याच्या शेवटी पावत्या बनवताना रात्र जाते
  • बेरजेत चूक झाली की दलालाशी वाद
  • कोणता दलाल वाढला, कोणता थांबला - कळतच नाही
  • गाडीच्या विम्याची मुदत संपली ते लक्षातच येत नाही

✨ खेप सोबत

  • नाव टाइप करताच आपोआप सुचतं - नोंद एका मिनिटात
  • एकूण भाडे आणि दलालनिहाय पावती एका क्लिकमध्ये
  • बेरीज आपोआप, अचूक - प्रिंट करा किंवा शेअर करा
  • व्यवसाय सारांश: दलाल, मालधणी, गाडीनिहाय आकडे
  • गाडी, विमा मुदत, दुरुस्ती आणि चालकाची माहिती एकत्र
डेमो

२ मिनिटांत पहा खेप कसं काम करतं

माल नोंदीपासून भाडे पावतीपर्यंत - एकदम सोप्या भाषेत, मराठीत.

पूर्ण ४ मिनिटांचा व्हिडिओ पहा →

वैशिष्ट्ये

शेतमाल वाहतुकीसाठी लागणारं सगळं

भाजीपाला असो, फळे, कांदा-बटाटा किंवा धान्य - डाग, निशाणी आणि भाडे तुमच्या पद्धतीने.

बोलून नोंद करा

टाइप करायची गरज नाही. "गाडी, देणार, घेणार, किती डाग" - फक्त बोला, खेप फॉर्म भरतो. नावं जुन्या यादीशी आपोआप जुळतात.

नवीन

फोटोतून नोंद - जुनी वहीसुद्धा

पावती किंवा वहीच्या पानाचा फोटो काढा. खेप वाचतो, तुम्ही तपासा आणि एका क्लिकमध्ये सगळ्या नोंदी जतन करा.

नवीन

स्मार्ट माल नोंद

गाडी नंबर, माल देणारा, घेणारा, गाळा, डाग, निशाणी. जुनी नावं आपोआप सुचतात.

दैनंदिन नोंदी

भाडे हिशोब

घेणारानिहाय आठवड्याचं एकूण भाडे - निशाणीनुसार रेट, मागील बाकी आणि एकूण रुपये.

भाडे

दलालनिहाय पावती

वारनिहाय डाग आणि पोटली, प्रिंटसाठी तयार. एका पानावर किती नावं ते तुम्ही ठरवा.

भाडे पावती

व्यवसाय सारांश

कोणता दलाल वाढतोय, कोण नवीन, कोण थांबला. मालधणी, गाडी, निशाणी आणि मालप्रकारनिहाय आकडे.

मालकासाठी

गाड्या व विमा मुदत

चेसिस, आरसी बुक, विमा कंपनी आणि मुदत. नूतनीकरण एका क्लिकवर, एकही मुदत चुकणार नाही.

गाडी व्यवस्थापन

चालक व कामगार

चालकांची माहिती, गाडी नियोजन, दुरुस्ती खर्च आणि कामगारांची नोंद - वेगळ्या वहीची गरज नाही.

टीम
एक झलक

नोंद करा - पावती आपोआप तयार

खालील नावं आणि आकडे फक्त उदाहरणासाठी आहेत.

नवीन माल नोंद
१८/१०/२०२६
MH 14 XY 4521
रमेश पाटील
साई ट्र
साई ट्रेडर्स
साई फ्रूट कंपनी
१२०
गोणी
नोंद जतन करा
नाव टाइप करताच जुनी नावं सुचतात
दलालनिहाय भाडे पावती
साई ट्रेडर्स१२ ते १८ ऑक्टो.
वारडागपोटली
शनिवार११०८
रविवार९५६
सोमवार१४०१०
मंगळवार१२०७
बुधवार८५५
एकूण५५०३६
आठवड्याची बेरीज आपोआप - प्रिंटसाठी तयार
कसे काम करते

तीन पायऱ्या, बाकी खेप सांभाळेल

खेपेची नोंद करा

गाडी निघाली की मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून नोंद - डाग, निशाणी, गाळा.

हिशोब आपोआप

वारनिहाय, दलालनिहाय, मालधणीनिहाय बेरीज आणि भाडे - कोणतीही आकडेमोड नाही.

पावती द्या

आठवड्याच्या शेवटी पावती प्रिंट करा. मालकाला व्यवसाय सारांश एका नजरेत.

संपर्क

१५ मिनिटांचा डेमो - तुमच्याच वहीच्या पानावर

WhatsApp वर एक मेसेज करा. आम्ही तुमच्या दुकानात किंवा फोनवर खेप दाखवू - तुमच्या मागच्या आठवड्याच्या पावत्यांसह.

बटण दाबल्यावर WhatsApp उघडेल - फक्त "Send" दाबा.

तुमच्या व्यवसायासाठी खेप सुरू करा

तुमच्या व्यवसायात खेप कसं काम करेल, ते डेमोमध्ये पहा.

WhatsApp वर डेमो बुक करा